मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 2014 नंतर ‘हंगामा 2’ चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पुनरागमन केले. तिचा हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी आता अभिनेत्रीचे चाहते तिच्या ‘निकम्मा’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून काही अवधी आहे, मात्र ‘निकम्मा’ चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. या नव्या अवताराने शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर कमबॅक केले आहे. शिल्पाचा हा लूक तिच्या आगामी चित्रपटातील आहे.
View this post on Instagram
नुकतेच शिल्पाने सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. ती मोनोटोनीला कंटाळल्यामुळे तिने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर करत ती एका नवीन अवतारासह सोशल मीडियावर परतणार असल्याचे म्हटले होते. अभिनेत्रीचा हा नवा अवतार ‘निकम्मा’ चित्रपटातून समोर आला आहे. ज्यामध्ये ती हातात तलवार घेऊन सुपर वुमन लूकमध्ये दिसत आहे. शिल्पा शेट्टीचे सोशल मीडियावर पुनरागमन झाल्यानंतर तिचे चाहते चांगलेच खूश आहेत.
निकम्मा चित्रपटाचा हा लूक पाहून शिल्पा शेट्टी या चित्रपटात अॅक्शन करताना दिसणार असल्याचा अंदाज चाहत्यांकडून बांधला जात आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 17 मे रोजी रिलीज होणार आहे. शिल्पाने तिच्या लूकसह याची घोषणा केली आहे.
‘निकम्मा’ चित्रपटात शिल्पा शेट्टीशिवाय अभिमन्यू दासानी, शर्ली सेटिया आणि अभिमन्यू सिंह दिसणार आहेत. हा चित्रपट 17 जून 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅक्शन, एंटरटेनर आणि कॉमेडी चित्रपट ‘निकम्मा’ रुपेरी पडद्यावर मनोरंजनाचे पॅकेज घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ‘हिरोपंती’ आणि ‘बागी’ दिग्दर्शक शब्बीर खान यांच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे.