मुंबई – मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय आणि बोल्ड विथ ब्युटी चेहरा म्हणजे अभिनेत्री ‘अभिज्ञा भावे’. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत मोनिका ही निगेटिव्ह शेडची भूमिका वठवणारी अभिज्ञा भावे. या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली.
View this post on Instagram
मात्र, अभिज्ञाला ‘तुला पाहते रे’ या मालिकेच्या माध्यमातून विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेव्यतिरिक्त ती अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये झळकली आहे. सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असणाऱ्या अभिज्ञा भावेने आपल्या हटके स्टाईल आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
अलिकडेच तिनं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या आगामी प्रोजक्टविषयी माहिती दिली आहे. ZEE मराठी नव्या मालिकेत ती एका नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे तिनं सांगितलं आहे.
बऱ्याच वर्षांनी लोकप्रिय अभिनेता स्वप्निल जोशी ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत मालिकेत दिसणार आहे. ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत स्वप्निल आणि अभिनेत्री शिल्पा तुळस्कर एक फ्रेश जोडी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकताच स्वप्निलने मालिकेचा पहिला प्रोमो शेअर केला होता. ज्यात स्वप्निल आणि शिल्पाचा लुक दाखवण्यात आला होता.
आता या मालिकेत अभिज्ञा भावे देखील दिसणार आहे. तिची भूमिका या मालिकेत नेमकी सकारात्मक असणार की नकारात्मक याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र अभिज्ञा भावेला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र उत्साही आहेत.