fbpx

अभिजित राजेंना जावयाचा मान, मिळणारअधिकमासाचं वाण !

मुंबई-‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद तर मिळत आहेच पण प्रेक्षक ‘आसावरी, अभिजित, शुभ्रा आणि बबड्या’ या व्यक्तिरेखांच्या प्रेमात आहेत.

अस म्हणतात दर ३ वर्षांनी येणाऱ्या पुरुषोत्तममासात, (अधिकमासात) जावयाचा विशेष मान असतो, आणि आता तोच मान कुलकर्ण्यांचे जावई अभिजित राजेंना मिळणार आहे. असावारीने देखील अभिजितसाठी नऊवारी साडी नेसली आहे. आजोबा गावाला असल्यामुळे असावरीच जावयाचा मान म्हणून शुभ्रा आणि सोहम कडून अभिजित राजेंचे पाय धुवून घेते. हा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.