Abhijeet Dipke : कॉक्रोच जनता पार्टी नावाने सोशल मिडिया अकाऊंट आणि पक्ष सुरू केलेल्या अभिजीत दिपकेंनी देशाचे लक्ष वेधले आहे. दिपकेंनी सुरू केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या इंस्टा आणि ट्विटरवरील अकाऊंने अवघ्या चार दिवसांतच 10 मिलियन्सचा टप्पा पार केला. या माध्यमातून सरकारला लक्ष्यही करण्यात येऊ लागल्याने अभिजीत दिपकेंना धमक्याही देण्यात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी अभिजीत दिपकेंच्या हिंगोलीतील घराबाहेर सुरक्षा तैनात केली आहे. (Abhijeet Dipke ) अभिजीत दिपकेंना दोन दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्याच्या मेसजचा स्क्रिनशॉट ट्विट करत दिपकेंनी ही माहिती दिली. तसेच, सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थन होऊ लागल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोडही उठली आहे. (Abhijeet Dipke ) त्याच पार्श्वभूमीवर अभिजीत यांच्या आई-वडिलांनी काळजी आणि भीतीही व्यक्त केली. त्यानंतर, आज हिंगोली पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर सुरक्षा तैनात केली आहे. दिपके आणि त्याच्या कॉक्रोच जनता पक्षाबाबत लोकांमध्ये फार जास्त उत्सुकता आहे. (Abhijeet Dipke ) त्याचे वेगळे प्रतिसाद, पडसाद घराजवळ उमटू नये म्हणून पोलीस संरक्षण देऊन दक्षता घेतली जात असल्याचे पोलीस उपायुक्तांचे म्हणणे आहे. तसेच, पुढील काही दिवस त्याच्या घराला सुरक्षा कायम राहील, असेही पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी यांनी सांगितले. (Abhijeet Dipke ) कॉक्रोच जनता पार्टीची वेबसाईटही बंद (Abhijeet Dipke) दिपकेंच्या कॉक्रोच जनता पार्टीवर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या पार्टीचे अधिकृत संकतेस्थळ बंद केले आहे. या संकेतस्थळावर पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करता येत होती. (Abhijeet Dipke ) मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये आधी पार्टीचे एक्स अकाऊंट आणि नंतर इन्स्टा अकाऊंट बंद करण्यात आले होते. पार्टीचे एक्स अकाऊंट, इन्स्टा आणि आता वेबसाईट बंद झाल्याने त्यांना संबंधित यंत्रणांनी मोठा झटका दिला आहे. पार्टीचे इन्स्टा आणि ट्विटर अकाऊंट बंद झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. मात्र, दिपकेंनी आपल्या समर्थकांना ही चूक टाळण्याचा सल्ला दिला होता. समर्थकांनी घाईघाईने कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये. ज्यामुळे आपल्या चळवळीवर परिणाम होईल, असे दिपके यांनी म्हटले होते. (Abhijeet Dipke )