अभिजीत बिचुकले जिल्हा रुग्णालयात दाखल

सातारा : साताऱ्याचे राजकीय व कवी मनाचे नेते आणि कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये सर्वाधिक वादग्रस्त आणि चर्चेत असलेला स्पर्धक अभिजीत बिचुकले याला धनादेश न वटल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी शुक्रवारी मुंबईतून बिग बाॅसच्या सेटवरच अटक केली होती.

त्यानंतर सातारा शहत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजीतच्या शनिवारी पहाटे अचानक छातीत दुखू लागल्याने व त्याचा रक्तदाब वाढल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, दुपारच्या बारा वाजले तरी अभिजीतला प्रकृतीच्या कारणाने व न्यायालयाला सुट्टी असल्याने रुग्णालयातच ठेवले आहे. सातारा शहरचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्यासह मोठा फाैजफाटा जिल्हा रुग्णालयात तैनात केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.