बारामती (प्रतिनिधी) – विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बारामतीतून 36 उमेदवारांनी 46 अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी), युगेंद्र पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), त्रिशला मिलिंद कांबळे (बहुजन समाज पार्टी (आंबेडकर), संदीप चोपडे (राष्ट्रीय समाज पक्ष), सोयल शहा युनुस शहा शेख (समता पार्टी), विनोद शिवाजीराव जगताप (संभाजी ब्रिगेड पार्टी),
बाळासाहेब मारुती धापटे (भारतीय नवजवान सेना पक्ष), मंगलदास निकाळजे (वंचित बहुजन आघाडी), अनुराग खलाटे (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), चंद्रकांत खरात (बहुजन समाज पार्टी), अजित प्रदीप पवार (सनय छत्रपती शासन) यांच्यासह सुरेंद्र जेवरे,
विक्रम कोकरे, संतोष पोपटराव कांबळे, सचिन आगवणे, राहुल थोरात, मिथुन आटोळे, शिवाजी कोकरे, अमोल आगवणे, कल्याणी वाघमोडे, दादा थोरात, विनोद जगताप, अमोल चौधर, अभिजित कांबळे, बाळासाहेब धापटे, अब्दुलरोफ उर्फ रज्जाक मुलाणी, पंकज भिसे,
अनुराग खलाटे, दत्तात्रय जराड, कौशल्या भंडलकर, अभिजित वामनराव बिचकुले, संभाजी पांडुरंग होळकर, पंढरीनाथ रसाळ, धनंजय गडदरे, सीमा चोपडे, सविता शिंदे, दिलीप नाळे, विनोद चांदगुडे, यांनीही अर्ज दाखल केले आहेत. अभिजित बिचकुले हे अभिनेते आहेत, तर सुरेंद्र जेवरे शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत.