अभिजित बिचुकलेला तूर्तास तरी जामीन मुश्कील

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने साताऱ्यातील कवी मनाचा नेता आणि बिग बॉस फेम ‘अभिजित बिचुकले’ची जमिनासाठीची याचिका निकाली काढली आहे. त्यामुळे अभिजित बिचकुले याला तूर्तास तरी जामीन मिळणे मुश्कील आहे. परंतु खंडणीच्या गुन्ह्यांखाली दाखल खटला लवकर संपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.

अभिजितवर 2012 मधील साताऱ्यातील फिरोज पठाण यांना खंडणी मागितल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्याही प्रकरणात बिचुकले न्यायालयीन कामकाजात नियमित हजर राहत नव्हता. वेळोवेळी त्याला हजर राहण्याची समज दिल्यानंतरही तो गैरहजर राहिला होता. अखेर दि.15 जून रोजी न्यायाधीश आवटे यांनी अभिजीतला अटक करून हजर करण्याचे आदेश दस्तुरखुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला अभिजीतला अटक करून न्यायालयात हजर करण्याच्या सूचना दिल्यानंतर त्याला सरळ ‘बिग बॉस’च्या सेटवरूनच अटक करण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.