बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

जालना : बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टीकाँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादेत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज ही घोषणा केली.

काही लोक पक्षात राहून पक्षविरोधी कामं करत आहेत. जालन्यात एक भूमिका अन् औरंगाबादेत एक भूमिका असं चालणार नाही. सत्तारांनी पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची हकालपट्टी केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

भोकरदन येथे विलास औताडे यांच्या प्रचारार्थ आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. जालना उमेदवारी देताना आम्ही सत्तार यांना विश्वासात घेतले होते. एवढंच नव्हे तर त्यांना स्वतःलाही उमेदवारी देऊ केली होती. मात्र, त्यांनी ती स्वीकारली नाही. ते पक्षात होते तोपर्यत आम्ही त्यांचा आदर राखला. सत्तारांना मी पक्षातून काढतो, आता विषय संपला आहे, असेही अशोक चव्हाण ठणकावून सांगितले आहे.

दरम्यान, औरंगाबाद लोकसभेसाठी पक्षाने सुभाष झांबड यांना तिकीट दिल्यामुळे सत्तार नाराज होते. तिकीट देताना मला विश्वासात घेतले नाही असा आरोप करत त्यांनी अशोक चव्हाणांकडे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्त केला होता. यानंतर त्यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले होते.

पक्षानं तिकीट नाकारल्यानंतर पक्षाविरोधी भूमिका घेत काँग्रेसचा पराभव करण्यासाठी ते प्रयत्नशील झाले होते. यासाठी त्यांनी औरंगाबादमधून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र अपक्ष उमेदवारी मागे घेत त्यांनी काँग्रेस उमेदवारांला पाठिंबा न देत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.