अल्जियर्स : अल्जेरियाचे विद्यमान अध्यक्ष अब्देलमादजीद तेब्बौने यांची अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना तब्बल ९७ टक्के मताधिक्य मिळाले आहे. तब्बौने यांनी लष्कराच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली होती.
त्यांना आव्हान देणारे मूव्हमेंट ऑफ सोसायटी फॉर पीस पक्षाचे पुराणमतवादी अब्देलाअली हसनी चेरीफ यांना अवघी ३ टक्के मते मिळाली. तर समाजवादी पक्षाचे युसेफ औचिचे सोशॅलिस्ट पोर्सेस फ्रंटच्या उमेदवाराला २.१ टक्के मते मिळाली.