ऍक्टिव्ह बाधितांची संख्याही साडेपाच हजारांपुढे
पुणे – शहरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून, बुधवारी आतापर्यंत सगळ्यांत जास्त म्हणजे 853 बाधितांची नोंद झाली असून, सर्वाधिक 8 हजार 13 स्वॅब टेस्टही बुधवारी झाल्या आहेत.
करोना बाधितांची संख्या वाढत असल्याबद्दल भीती व्यक्त केली जात आहेच; परंतु एक हजारापेक्षा जास्त संख्या होऊ नये यासाठीही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.
शहरात बाधितांची एकूण संख्या आता 2 लाख 4 हजार 649 झाली आहे; तर त्यातील 1 लाख 94 हजार 229 बाधित बरे झाले आहेत.
बाधितांमधील ऍक्टीव्ह रुग्ण संख्याही वाढली असून, ती 5 हजार 551 झाली आहे. त्यातील 281 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, 630 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
गेल्या 24 तासांत सात रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील दोनजण पुण्याबाहेरील आहेत. यांचा समावेश करून आता मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 4 हजार 869 झाली आहे. आजपर्यंत एकूण 11 लाख 62 हजार 798 संशयितांची स्वॅबटेस्ट झाली आहे.