-->

अबब..मिळकतींची थकबाकीच साडेपाच हजार कोटींवर!

वसुली केल्यास करवाढीची गरजच नाही : वर्षानुवर्षे कर बुडवणाऱ्यांवर सोयीस्कर दुर्लक्ष

पुणे – करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातही राज्यात सर्वाधिक मिळककर पुणेकरांनी जमा केला आहे. त्यामुळे लॉकडाउन असतानाही इतिहासातील सर्वाधिक कर वसुलीचा विक्रम महापालिकेने केला आहे. मात्र, त्यासाठी पुणेकरांचे कौतूक करण्याऐवजी आयुक्तांनी करवाढीचा प्रस्ताव ठेवत पुणेकरांना शिक्षाच सुनावली आहे.

प्रस्तावित 11 टक्के करवाढीतून अवघे 130 कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र, त्याचवेळी मिळकतकराची थकबाकी तब्बल 5 हजार 547 कोटींवर गेली आहे. त्यामुळे या थकबाकी मधील 2.5 टक्के रक्कम वसूल केली, तरी हा निधी मिळणार आहे. त्यामुळे ही दरवाढ कशाला? असा प्रश्‍न सर्वसामान्य पुणेकर विचारत आहेत.

मिळकतर विभागाकडे सुमारे साडेदहा लाख मिळकतींची नोंद आहे. त्यातील जेमतेम सुमारे साडेसात लाख दातेच नियमित कर भरतात, तर काही कर आकारणी विरोधात न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे त्यांनी वर्षानुवर्षे थकबाकी भरलेलीच नाही.

तर अनेक थकबाकीदार राजकीय आश्रय मिळवत वर्षानुवर्षे कर बुडवत आहेत. त्यांच्या वसुलीकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने ही थकबाकी वसूल करण्यासाठी कडक उपाय योजना केल्यास पुढील किमान 10 वर्षे प्रशासनास पुणेकरांवर करवाढ करण्याची वेळ येणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.