अबब! आत्या-भाच्यानं बांधली १८व्या वर्षी लगीनगाठ

पटना- नात्याने आत्या असलेल्या मुलीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन भाच्याशी विवाह केला. या अनोख्या विवाहाची सध्या बिहारमध्ये चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली. 18 वर्ष पुर्ण होताच त्या दोघांनी लगीनगाठ बांधली.

आदित्य पटेल आणि आंचल पटेल असं या दोघांची नावे आहेत. काही दिवसांपुर्वी आदित्य मामाकडे एका कार्यक्रमासाठी आला असता त्याने आचलला पाहिले. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी एकमेंकांना प्रेमाची कबुली दिली मात्र नात्यानं आत्या-भाचा लागत असल्याने या विवाहाला कुटुंबीयांनी विरोध केला होता. नात्याने आत्या आणि भाचा असलेल्या दोघांनी एका मंदिरात लग्न केलं. मात्र या लग्नाची मोठी चर्चा असून आत्या असणाऱ्या त्या नवरीचं वय 18 वर्ष असून भाच्याचं, नवरदेवाचं वय 19 वर्ष आहे.

कुटुंबीय मुलीचा मानसिक छळ करत असल्याचं मुलीने सांगितले. मात्र जसं 18 वर्ष पुर्ण झाले तसंच तिने घरातून पळून जाऊन भाच्याशी विवाह केला. मुलगी घरात नसल्याने कुटुंबीयांनी मुलीची शोधाशोध केली. त्यावेळी मुलगी थेट भाच्याच्या घरी सापडली. मात्र दोघांनी विवाह केल्याचं कळताच कुटुंबीयांनी माघार घेत विवाहाला परवानगी दिली.

दरम्यान, या अजब विवाहाची बिहारमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. प्रेमात असलेल्या लोकांनी एकमेकांसाठी कुटुंबाच्या विरोधात जाऊन, समाजाला झुगारुन अनेक गोष्टी केल्याचं पून्हा एकदा समोर आलं आहे. ‘बचपन का प्यार’ असं सुद्धा यांच्या विवाहाला संबोधलं जात आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.