Kolkata – आर जी कर रुग्णालय प्रकरणामुळे पश्िचम बंगालमधील वातावरण तापलेले असताना शुक्रवारी एका बेवारस बॅगेचा स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
यावेळी एक पादचारी यामध्ये जखमी झाल्याची माहिती समोर आली असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.
पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामध्ये एका बेवारस बॅगेत ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला. या बेवारस बॅगेला उचलण्यास गेलेली एक व्यक्ती या स्फोटात जखमी झाली. कोलकता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सध्या जखमी व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली असून त्या व्यक्तीला एनआरसी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणामध्ये पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरु केला.या स्फोटाची फोरेन्सिक विभागाकडून तपासणी केली जात आहे.