#IPL | डीव्हिलीयर्सने केले जीवलग मित्राकडे दुर्लक्ष

ऑल टाईम आयपीएल संघाचे नेतृत्व धोनीकडे

मुंबई – दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटीपटू व आयपीएल स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलीयर्सने आयपीएल स्पर्धेतील आपला ऑल टाईम इलेव्हन संघ घोषित केला. मात्र, त्याने आपला जीवलग मित्र व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याऐवजी महेंद्रसिंग धोनीकडे संघाचे नेतृत्व दिले आहे. त्यामुळे कोहलीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्‍त केली आहे.

आयपीएल स्पर्धेत कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या डिव्हिलीयर्सने आपल्या निवडलेल्या संघाचे कर्णधारपद बेस्ट फिनिशर महेंद्रसिंग धोनी याच्याकडेच दिले आहे. तसेच भारतीय संघाचा माजी कसोटीपटू व आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्यासह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि हिटमॅन रोहित शर्मा यांना आपल्या संघात स्थान दिले आहे.

कोहलीला केवळ तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज म्हणूनच संघात घेतले आहे. चौथ्या क्रमांकावर त्याने स्वतःच्या नावासह न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन व ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ अशा तीन नावांचा उल्लेख केला आहे. धोनीला त्याच्याच सहाव्या क्रमांकावर ठेवले आहे. यष्टीरक्षक म्हणूनही डिव्हिलीयर्सने धोनीलाच पसंती दिली आहे. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानलाही संघात जागा दिली आहे.

डिव्हिलीयर्सचा आयपीएल ऑल टाईम संघ :

वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, विराट कोहली, केन विल्यमसन/स्टीव्ह स्मिथ/एबी डिव्हिलीयर्स, बेन स्टोक्‍स, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, राशिद खान, भुवनेश्‍वर कुमार, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.