Suryakumar Yadav – झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या सूर्यकुमार यादवने गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. त्याने या सामन्यात २५ चेंडूत ६१ धावांची दमदार खेळी केली. सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने केएल राहुल आणि सूर्यकुमारच्या अर्धशकांमुळे १८६ पर्यंत मजल मारली. मोठ्या धावसंख्येचा दडपणाखाली झिम्बाब्वेचा संघ १७.२ षटकात अवघ्या ११५ धावा करून सर्वबाद झाला. टीम इंडियाने हा सामना तब्बल ७१ धावांनी जिंकला.
“भगव्या रंगानेच सेमीफायनलमध्ये पोहोचवले”, भारताच्या माजी क्रिकेटपटूचा पाकिस्तानला चिमटा!
सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) त्याच्या झंझावाती खेळीमुळे भारताच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने मैदानात चौफेर फटकेबाजी करत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याचबरोबर या सामन्यात सूर्यकुमार यादवने एका कॅलेंडर वर्षात १००० धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. टी-२० विश्वचषकात विराट कोहलीशिवाय सूर्यकुमार यादवनेही चांगल्याच धावा ठोकल्या आहेत. यंदाच्या विश्वचषकात सूर्यकुमारने ५ सामन्यात ७५ च्या सरासरीने आणि १९३.९७ च्या स्ट्राईक रेटने २२५ धावा केल्या आहेत. तर विराट दुसरीकडे विराट कोहलीने सर्वाधिक २४६ धावा फाटकावल्या आहेत.
झिम्बाब्वे विरुद्धच्या सूर्यकुमारच्या ( Suryakumar Yadav ) खेळीत ३६० डिग्रीची झलक पाहायला मिळाली. त्यामुळे त्याची तुलना ३६० डिग्री खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेल्या एबी डिव्हिलियर्सशी केली जात आहे. याबाबत सूर्यकुमार म्हणाला होता की, “जगात ३६० डिग्रीत फलंदाजी करू शकणारा एकच खेळाडू असून तो एबी डिव्हिलियर्स आहे. मी फक्त त्याप्रकारे खेळण्याचा प्रयत्न करत आहे. मी नेहमीच मैदानानुसार खेळण्याचा विचार करतो. त्यामध्ये कधी मी यशस्वी होतो, कधी अयशस्वीही होतो.”
सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यात ३६० डिग्री खेळाडू म्हणून तुलना केली जात आहे. यावर डिव्हिलियर्सनेच खास प्रतिक्रिया दिली आहे. डिव्हिलियर्सने ट्विट शेअर करत म्हटले की,” आपण त्या दिशेने खूप जास्त वेगाने जात आहेत आणि त्याचा वेग माझ्यापेक्षाही जास्त आहे. आजची खेळी चांगली खेळली. असे एबी डिव्हिलियर्सने म्हटले आहे.