आसू, खटकेवस्तीत राजेगटाचा झेंडा

दोन्ही ग्रामपंचायतीत विरोधी पॅनलचा धुव्वा
कोळकी – आसू ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाराजे खर्डेकर, पंचायत समितीचे उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर आणि कॉंग्रेसचे विशालसिंह माने पाटील यांच्या नेतृत्वाखालील काळेश्‍वर पॅनलने 13 पैकी 10 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले.

लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत याच गटाचे महादेव दत्तात्रय सकुंडे मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले. त्यांना 2551 मते मिळाली तर विरोधी उमेदवार अमोल पवार यांना 850 मते मिळाली. विरोधी गटाच्या काळभैरवनाथ
पॅनलला तीन जागा मिळाल्या. खटकेवस्ती ग्रामपंचायत निवडणूकही राष्ट्रवादी कॉंग्रेस अंतर्गत राजे गट पुरस्कृत दोन गटात होऊन बापूराव गावडे यांच्या नेतृत्वाखालील

पॅनलने 6 जागा जिंकून सत्ता मिळवली. येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत बापूराव गावडे विजयी ठरले. त्यांना 1222 मते मिळाली, तर विरोधी सुहास खटके यांना 846 मते मिळाली. बजरंग खटके गटाला तीन जागा मिळाल्या. आसू ग्रामपंचायतीवर 1967 पासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाराजे खर्डेकर यांचे वर्चस्व आहे. निवडणुकीत पंचायत समितीचे उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर आणि कॉंग्रेसचे विशालसिंह माने-पाटील यांची आघाडी झाली. आघाडीचे
5 उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित 8 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 5 जागांवर काळेश्‍वर पॅनलचे, तर ऍड. जीवन पवार यांच्या नेतृत्त्वाखालील विरोधी काळभैरवनाथ पॅनलचे 3 उमेदवार विजयी झाले. खटकेवस्ती ग्रामपंचायत निवडणूक बापूराव गावडे आणि बजरंग खटके या दिग्गज नेत्यांच्या गटात चुरशीची झाली. यात बापूराव गावडे यांच्या गटाने बाजी मारली.

विजयी उमेदवारांचे ना. रामराजे नाईक-निंबाळकर, दादाराजे खर्डेकर, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभाताई धुमाळ, उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर यांनी अभिनंदन केले.

आसू ग्रामपंचायत निकाल :

काळेश्‍वर पॅनलचे विजयी उमेदवार : वॉर्ड 1 – प्रतिभा सागर सस्ते, अच्युत शिरतोडे (बिनविरोध), वॉर्ड 2 : मुमताज जमीर महात, मनीषा गोफणे (बिनविरोध), खाजासाब हुसेन शेख (624),
वॉर्ड 4 – सुनीता मधुकर फुले (बिनविरोध), धनराज घोरपडे (603), नितीन गोडसे (580),
वॉर्ड 5 – धनाजी बोडरे (311), पार्वती भोसले (404).

काळभैरवनाथ पॅनलचे विजयी उमेदवार :
वॉर्ड 3 – जीवन पवार (312), पल्लवी पवार (322), कल्पना पवार (298).

खटकेवस्ती ग्रामपंचायत निकाल :
बापूराव गावडे यांच्या पॅनलचे विजयी उमेदवार : वॉर्ड 1- नलिनी रामचंद्र खटके (519), वैशाली नवनाथ गावडे (420), लक्ष्मण नाना दडस (504), वॉर्ड 3 – योगेश गावडे (411), योगेश ढोबळे (461), मंदा सस्ते (428).
बजरंग खटके यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनलचे विजयी उमेदवार : वॉर्ड क्र. 2 – नवनाथ खटके (362), रंजना खटके (409), सविता खटके (447)

Leave A Reply

Your email address will not be published.