पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील युवा उद्योजक अतिश आनंदा बारणे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी अतिश बारणे यांनी ही निवड केली असून यावेळी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांची उपस्थिती होती. बारणे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. निवड झाल्यानंतर अतिश बारणे यांनी आपण पक्षवाढीसाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.