निंभारीजवळ आयशर, दुचाकी अपघातात एक ठार

दोन गंभीर जखमी

करजगाव: नेवासा-पानेगाव रोडवर निंभारी येथे आयशर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात यशवंत संतोष विटनोर (वय 50, रा. मांजरी ता. राहुरी) हे जागीच ठार झाले.तर शिवाजी यादव भालसिंग (वय 65, पानेगाव, ता. नेवासा) यांची मांडी तुटली असून, गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नेवासा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मच्छिंद्र आप्पासाहेब पुराने (वय 48, करजगाव ता. नेवासा) हे जखमी झाले असून राहुरी येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विटनोर विहिरीचे खोदण्याचे काम करण्यासाठी एमएच 16 एएन 557 मोटरसायकलवरून नेवाश्‍याकडे जात होते. तर नेवाशावरून पानेगावकडे जाणाऱ्या एमएच 20 सीटी 671 आयशर गाडीने धडक दिल्यामुळे यंशवत विटनोर यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. विटनोर यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नेवासा ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आला आहे. यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार असून, त्यांच्यावर मांजरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पोलीस पाटील संतोष पवार घटनेची माहिती पोलिसांना दिली. नेवासा पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून पुढील कार्यवाही केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.