शिक्षिकांच्या हस्ते “उन्नती’च्या गणरायाची आरती

पिंपरी  – पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिला शिक्षकांच्या हस्ते आरती करण्यात आली. उन्नती फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणारा “ती’ चा गणपती महोत्सवामध्ये गणरायाची पूजा व आरती समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांकडून करण्यात येते.

शिक्षक दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील पी.के.इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. गणरायाची आरती शिक्षिकांच्या हस्ते करण्यात आली. फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, पी.के.इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, उन्नती संचलित विठाई वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष पवार, रमेश वाणी, तात्या शिनगारे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.