पवनमुक्तासन (पचनक्रियेचे कार्य सुधारवणारे)

-सुजाता टिकेकर

पवन म्हणजे वायू हा वायू मुक्‍त करणारे म्हणजेच गॅसेसचा त्रास दूर करणारे. सहज सुलभ आसन म्हणजे पवनमुक्‍तासन. हे शयनस्थितीतील आसन करायला सोपे आहे.

पाठीवर सरळ झोपून पाय ताठ ठेवून दोन्ही पाय जुळवलेल्या अवस्थेत गुडघ्यात वाकवून त्या पायांचा पोटावर दाब द्यायचा.
आणि हाताची घडी गुडघ्यावर घालून हनुवटी जास्तीत जास्त गुडघ्याकडे न्यायची. आपले नाक दोन गुडघ्यांच्यामध्ये नेण्याचा प्रयत्न करावा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या स्थितीत मनातल्या मनात 10 आकडे तरी मोजावेत. पोट मांडीने दाबून धरताना श्‍वास रोखावा. ज्यावेळी डाव्या पायाने ही क्रिया केली जाते तेव्हा “दक्षिण पवनमुक्तासन’ म्हणतात तर दोन्ही पायांनी एकदम ज्यावेळी हे आसन केले जाते तेव्हा ते “पूर्ण पवनमुक्‍तासन’ होते. दोन्ही हातांनी पाय पकडून ठेवलेले असतात. श्‍वास बाहेर सोडून रोखला जातो. त्यानंतर हळूहळू श्‍वास घेत घेत सावकाश पाय लांब केले जातात.

गर्भधारणेनंतर हे आसन स्त्रियांनी अजिबात करु नये. एरव्ही हे आसन नियमित केल्यास म्हणजे झोपेतून उठल्या उठल्या शौचाला जाण्यापूर्वी केल्यास या आसनामुळे शौचास साफ होते. गॅसेसचा त्रास कमी होतो. पोटाची चरबी कमी होते. पोटातील वायूमुळे ज्यांचे पोट सुटलेले असते त्यांनी हे आसन नियमित करावे.

हृदयविकार आणि फुफ्फुसांच्या रोगांना प्रतिबंध होतो. वायूविकार, मलावरोध, अपचन, गर्भाशयातील रोग, ओटीपोटात होणारा रक्‍त संचय, कृमीरोग, आंत्रवृद्धी, मूळव्याध, वातविकार, रक्‍तदोष, पोट फुगणे अशा अनेक रोगांना दूर करणारे, शरीर सुदृढ करणारे, अपान वायूची गती ठीक करणारे “पवनमुक्‍तासन’ हे खरोखरच शरीर व्याधींपासून मुक्‍त ठेवते.

वातपित्त कफाचे संतुलन राखणारे पवनमुक्‍तासन म्हणूनच नियमित करावे. पचनक्रियेचे कार्य या आसनामुळे सुधारते पण त्यासाठी दोन्ही गुडघे, पोटऱ्या जुळवून पोटावरती दाब आल पाहिजे. बऱ्याचजणांना पोटावर दाब देता येत नाही. पाय गुडघ्यात दुमडून त्यांचे पोटावर घेतले जात नाहीत म्हणूनच हे आसन तज्ज्ञ योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावे.

नाक गुडघ्यांना श्‍वास सोडत लावायचे असते जे अवघड आहे. पण यातून गॅसेसचा त्रास पूर्णपणे जातो व पचनसंस्था सुधारते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)