कोरड्या केसांची काळजी (भाग १)

-डाॅ.शितल जोशी

थंडी पडायला लागली की केस कोरडे होणे, गळणे, चाई पडणे, तसंच त्वचेवर ओरखडे उमटणे, त्वचा काळवंडणे, पापुद्रे सुटणे, भेगा पडणे असे विकार व्हायला सुरुवात होते. या विकारांकडे दुर्लक्ष झालं तर ते गंभीर स्वरूप धारण करू शकतात. टक्‍कल पडू शकतं किंवा त्वचा निस्तेज दिसायला लागते. म्हणूनच या दिवसांत केसांची आणि त्वचेची काळजी घेणं आवश्‍यक आहे. कशी हे पाहू या.

नाही म्हटलं तरी पुण्यात थंडी पडायला सुरुवात झाली आहे. अंगाला वारा झोंबू लागला आहे. आता या थंडीत त्यामुळे आता केस कोरडे होणे, गळणे अशा विविध समस्या उद्‌भवायला लागतील. या सगळ्यापासून बचाव करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा कोणती तेलं आहेत जी तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी पोषक ठरतील हे जाणून घेऊया. केसांप्रमाणेच थंडीचा परिणाम त्वचेवरही होताना दिसतो. त्वचा कोरडी होते, ओरखडे उमटतात. भेगा पडतात. इतकंच नाही तर काही जणांची त्वचाही काळवंडते किंवा त्वचेला खाज उठते. अशा या त्वचेचं थंडीपासून संरक्षण करायला हवं. त्यासाठी काय करायला हवं हे जाणून घेऊ या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केसांची काळजी

ज्यांना सकाळी लवकर बाहेर पडायला लागतं त्यांनी केस कव्हर करा. कव्हर करा म्हणजे झाका. बोचरे वारे आणि या वाऱ्यामुळे धुळीचे कण तुमच्या केसांत जाऊन ते खराब होणार नाहीत. आपल्याकडे हॅट घालण्याची पद्धत नाही. त्यामुळे तुमचे केस संपूर्ण झाकतील असे स्कार्फ वापरा. आठवड्यातून एकदा तरी केसांना डीप कंडिशननिंग करा. यामुळे केसांना मॉइश्चर मिळेल. तसंच शॅम्पू केल्यावर केस अतिशय कोरडे होतात. त्यामुळे शॅम्पू केल्यावर केसांना तेल लावावं. म्हणजे त्यांना पोषण मिळेल. आणि ते मऊ आणि चमकदार दिसतील. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा केस शॅम्पूने धुतल्यास कोरडे होण्यापासून वाचतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुमचे केस कोरडे असले पाहिजेत. दुसरं असं की ओले राहिले तर तुमच्या केसातलं मॉइश्‍चर थंड हवेमुळे तिथेच थिजू शकतं. जेणेकरून तुमचे केस कोरडे होणार नाहीत आणि तुटणार नाहीत. हिवाळ्यात नियमितपणे म्हणजे दर सहा ते आठ आठवड्यांनी तुम्ही तुमचे केस ट्रीम करा. म्हणजे केस दुभंगणार नाहीत.

तेल कोणते वापराल?

हल्ली केस गळण्याच्या समस्या खूप ऐकायला मिळतात. विशेषत: केस धुताना केस अधिक गळतात. थंडीच्या दिवसात तर ही समस्या अतिशय कॉमन झाली आहेत. केस गळतीमागे विविध कारणं असू शकतात. त्यात आपली बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयी यामुळे केस अधिक गळतात. त्यासाठी आपण कित्येक जाहिरातींना बळी पडतो. आणि तेल विकत आणतो. पण आपल्याकडे अशी काही नैसर्गिक तेलांचे प्रकार आहेत जी नियमित लावली तर आपल्या केसांचं आरोग्य सुधारेल.

कोरड्या केसांची काळजी (भाग २)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)