मांजरी(प्रतिनिधी) : मांजरी बुद्रुक गावातून भापकरमळा मार्गे सोलापूर रोड आणि मोरे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यात खड्डेच खड्डेच पडल्याने वाहनचालकच नव्हे तर नागरिकही वैतागले आहेत. येथील आम आदमी पार्टीने यावर आवाज उठवत भापकर मळा रस्त्यावर चक्क खड्डयात बसून आंदोलन केले. खड्ड्या पासून वाहनचालकाचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे का? असा प्रश्न करत आप ने प्रशासनचा निषेध नोंदवला.
मांजरी बुद्रुक हद्दीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त नागरिकांनी तसेच आम आदमी पार्टीचे राजेंद्र साळवे यांनी खड्ड्यात बसून निषेध नोंदवला. यावेळी गजानन घुले, अशोक घुले,गंगाराम खरात, नवनाथ पाटोळे,नंदकुमार बेलेकर,बापू खवरे,अमित राखपसरे, बाळासाहेब रणपिसे,अमोल घाडगे,नंदा खरात, लक्ष्मी लोणकर,पारूबाई भोकरे, रोहिणी शेंडकर, दादा आटोळे आदीजण या आंदोलनात सहभागी झाले होते.
गाव महापालिकेत समाविष्ठ झाल्यानंतर प्रशासनाने येथील नागरी सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यातच रस्त्यावर पडलेले खड्डे वारंवार सांगूनही बुजवले जात नाहीत. त्यामुळे आज आम्ही प्रशासनाचा निषेध व्यक्त करत खड्ड्यात बसून पालिकेचे लक्ष वेधले आहे. असे राजेंद्र साळवे यांनी सांगितले. महापालिका पथ विभागाचे उपअभियंता प्रवीण येळे यांनी निवेदन स्वीकारले.