Haryana Assembly 2024 | हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करत आहे. आम आदमी पार्टीने 11 उमेदवारांची तिसरी यादीही जाहीर केली आहे. यामध्ये भाजपच्या बंडखोरांनाही तिकीट देण्यात आले आहे. आम आदमी पक्षाने आतापर्यंत एकूण 40 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
‘आप’ने भाजपमधून आम आदमी पक्षात प्रवेश केलेल्या सतीश यादव आणि सुनील राव यांना उमेदवारी दिली आहे. तसेच काँग्रेसमधून ‘आप’मध्ये दाखल झालेले भीमसिंह राठी यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय चित्रपट अभिनेते राजकुमार राव यांचे मेहुणे सुनील राव यांना अटेली विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे. त्यांनी भाजप सोडून ‘आप’मध्ये प्रवेश केला आहे.
आम आदमी पार्टी की तीसरी सूची में आये सभी प्रत्याशियों को हार्दिक शुभकामनाएं। pic.twitter.com/nUPZPKhzhT
— Dr Sushil Gupta (@DrSushilKrGupta) September 10, 2024
याआधी मंगळवारी आम आदमी पार्टीने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, ज्यामध्ये माजी मंत्री छत्रपाल सिंह यांना बरवाला येथून उमेदवारी देण्यात आली आहे. सिंह यांनी एक दिवस अगोदर भारतीय जनता पार्टीमधून आपमध्ये प्रवेश केला होता.
आप आणि काँग्रेसची जागा वाटपाबाबतची चर्चा अयशस्वी
दरम्यान, हरियाणात निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर आहे. याआधी हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये युती करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, जागावाटपाबाबत चर्चा होऊ शकली नाही. दरम्यान, सोमवारी आम आदमी पक्षाकडून 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
हरियाणात एकूण 90 जागांवर निवडणूक होणार आहे. येथे एकाच टप्प्यात 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.