आप आमदाराला तीन महिने कारवासाची शिक्षा

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे दिल्लीतील आमदार मनोजकुमार यांना निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याच्या प्रकरणात तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सन 2013 च्या निवडणुकीच्यावेळी कल्याणपुरी भागातील एका मतदान केंद्रात त्यांनी हस्तक्षेप करून गोंधळ घातल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

आज अतिरीक्त महानगर न्यायदंडिधिकाऱ्यांनी त्यांना ही शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना या निर्णयाला वरीष्ठ कोर्टात आव्हान देता यावा यासाठी त्यांची दहा हजाराच्या जामीनावर मुक्तता केली. आपल्या 50 समर्थकांसह मतदान केंद्राच्या गेटवर त्यांनी मोठीच गडबड केल्याने त्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रत्यक्ष कारावासाची शिक्षा झालेले हे आम आदमी पक्षाचे पहिले आमदार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.