पंजाबमधील आपच्या नेत्यांनी घेतली सिसोदिया यांची भेट 

नवी दिल्ली : पंजाब प्रांतातील आम आदमी पार्टीच्या काही नेत्यांनी आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची काल रात्री भेट घेतली. या भेटीमागील कारण हे पंजाबमधील नेते सुखपाल सिंग खैरा यांना राज्य विधानसभेमधील विरोधीपक्ष नेते या पदावरून काढून टाकल्याचे आहे.
या भेटीनंतर सिसोदिया यांनी त्या आपच्या काही नेत्यांचा भेटी मागील काय  मनसुबा होता हे उघड केले नाही.  हे आमदार सुखपाल सिंग यांच्या जागी दलित नेते हरपाल सिंग चीमा यांच्या निवडी बद्दल विरोध दर्शविण्यासाठी आले नसल्याचे त्यांनी सांगितले. आप हे दलितांच्या हक्कांचे समर्थन करते त्यामुळे त्यांनी चीमा यांची निवड केली आहे असेही ते म्हणाले.
 “मला खूप दु:ख आहे की आमचे काही मित्र या गोष्टीला विरोध करत आहेत. मी त्यांना आज समजावून सांगितले की आम आदमी पार्टीची स्थापना ही दलितांच्या आणि गरिबांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी केली आहे. कॉंग्रेस, अकाली दल, आणि बीजेपी हे दलित आणि गरीबांना विरोध करतात,” असे आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले.
सिसोदिया हे पंजाबचे आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)