ईडीचा धक्कादायक दावा : शाहीनबाग आंदोलनाला पीएफआयचे आर्थिक पाठबळ
नवी दिल्ली : सुधारीत नागरीकत्व कायद्याविरोधात शाहीनबाग येथे सुरू असणाऱ्या आंदोलनाला पॉप्यलर फ्रंट ऑफ इंडियाकडून आर्थिक पाठबळ मिळत आहे. या संघटनेच्या प्रमुखांच्या संपर्कात आप आणि कॉंग्रेसचे नेते आहेत, असा दावा अंमलबजावणी संचनालयाने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन दिवस केला आहे.
शाहीनबाग आंदोलनाच्या विरोधात रण पेटवून त्या मुद्यावर दिल्ली विधानसभेची निवडणूक खेळण्याची भाजपची रणनिती स्पष्ट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचनालयाने केलेल्या आरोपांकडे राजकीय निरीक्षक पाहात आहेत. या संघटनेच्या बॅंक खात्याचा तपास ईडी करत आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये अलीकडे झालेल्या सुधारीत नागरीकत्व विरोधी दंगलीला केरळमधील संघटना पॉप्यलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने अर्थपुरवठा केला असल्याचे ईडीने म्हटले होते.
या संघटनेची अंमलबजावणी संचनालयातर्फे (ईडी) मनी लॉंड्रींग प्रकरणात 2018 पासून चौकशी करत आहे. हा कायदा मंजूर झाल्यानंतर पश्चिम उत्तर प्रदेशातील बॅंकात या संघटनेने 120 कोटी रुपये जमा केले असल्याचे इडीने म्हटले होते.
हा पैसा का कायद्याविरोधातील उत्तर प्रदेशातील निदर्शनांसाठी वापरला असावा असा संशय इडीने व्यक्त केला आहे. ईडीने आपला निश्कर्ष गृहमंत्रालयाला कळवला आहे.
दरम्यान, पीएफआयचे सरचिटणीस महंमद अली जिना यांनी याबाबतच्या वृत्ताचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. संघटनेच्या 73 खात्यातून 120 कोटी रूपये वळवण्यात आले आहेत. त्याचा वापर का विरोधी हिंसाचारासाठी केला गेला असे या अहवालात म्हटले आहे.