दिल्ली – आम आदमी पक्षाने दिल्ली येथून आपल्या सहा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यांनतर आज सोमवारी आम आदमी पक्षाच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांनी भव्य रोड शो करत पूर्व दिल्ली मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना आतिशी मार्लेना यांच्यासोबत आपचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया उपस्थित होते.
AAP candidate Atishi files nomination from East Delhi constituency. Delhi Deputy CM Manish Sisodia also present. pic.twitter.com/u2sDXvRwXD
— ANI (@ANI) April 22, 2019
आतिशी मार्लेना यांना पूर्व दिल्ली या मतदारसंघातून भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले अरविंदर सिंह लवली यांचे आव्हान असणार आहे. तर भाजपने याठिकाणी अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही.