मुंबई – तमिळ अभिनेत्री दीपाने आत्महत्या केलीय. दीपाचे खरे नाव पॉलिना जेसिका होते. अभिनेत्रीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटमधून संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. असे म्हटले जात आहे की, दीपाला तिच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी येत होत्या. दीपाच्या लव्ह लाईफमुळे ती नाराज होती आणि त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी दीपाच्या घरातून सुसाईड नोटही जप्त केली आहे.
या सुसाईड नोटमध्ये दीपा उर्फ पॉलिना जेसिका हिने लिहिले आहे की,’मी आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरत नाही. दीपाच्या कथित आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दीपाच्या विरुगंबक्कम येथील अपार्टमेंटमध्ये जाऊन चौकशी केली. यादरम्यान त्यांनी इमारतीचे आणि इमारतीच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही मागवले आहेत.’
दीपाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे सांगितले जात असले तरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, दीपा एक ज्युनियर आर्टिस्ट होती. मिळनाडूतील विरुगम्बक्कम येथील एका अपार्टमेंटमध्ये एकटीच राहत होती. गेल्या आठवड्यात शनिवारी दीपाची मैत्रिण तिच्या घरी पोहोचली तेव्हा तिला दीपाचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला.