Amisha Patel : अभिनेता सनी देओलचा ‘बॉर्डर २’ हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर धुमाकूळ घालत आहे. तब्बल २९ वर्षांनी बॅार्डरचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने एक वेगळाच आनंद प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॅार्डर २ ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला. येत्या काही दिवसांत हा चित्रपट कमाईचे मोठे आकडे गाठण्यात यशस्वी होईल, असे सांगितले जात आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने भारतात १८० कोटी रुपयांची कमाई केली असून, वर्ल्डवाइड कलेक्शनने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. यामुळे मेकर्सने बॅार्डर ३ ची देखील घोषणा केली आहे. या सगळ्यात अभिनेत्री आमिषा पटेल (Amisha Patel )हिने गदर ३ बाबत हिंट देत थेट कमाईचे आकडे चित्रपट येण्याअगोदरच सांगितले आहेत. हेही वाचा :Mother of All Deals : ‘मदर ऑफ ऑल डील्स’ची घोषणा ; EU कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला म्हणाल्या, “ही तर फक्त सुरुवात” रविवारी संध्याकाळी आमिषाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रश्नोत्तराचे सेशन घेतले. या सेशनमध्ये तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरं दिली. एका चाहत्याने आमिषाला थेट प्रश्न विचारला, “सगळे फॅन्स गदर ३ ची वाट पाहत आहेत. तारा आणि सकीना ही जोडी पुन्हा कधी पाहायला मिळणार?” या प्रश्नावर अमिषाने दिलेले उत्तर चर्चेत आहे. गदर २ मधील अभिनेता सनी देओल अमिषा म्हणाली, “माझ्यावर विश्वास ठेवा, जेव्हा कधीही गदर ३ मध्ये प्रेक्षक तारा-सकीनाची जोडी पाहतील तेव्हा देवाच्या कृपेने हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल. यावेळी सिनेमा बिग बजेट, मोठ्या स्केलवर आणि दमदार कंटेंटसह येईल. पहिल्याच दिवशी ६० कोटींपेक्षा जास्त कमाईचा मोठा धमाका होईल.” असे भाकित गदर ३ येण्याअगोदरच वर्तवले आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर धुरळा उडवला होता. याशिवाय प्रेक्षकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये गदरने स्थान मिळवले. त्यानंतर २०२३ मध्ये गदरचा सीक्वल गदर २ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. हेही वाचा : Rupali Chakankar : “…तर दीप्ती वाचली असती”; आयोगावर महिलांचा संताप, रुपाली चाकणकर म्हणाल्या…