आमिर खानच्या “लाल सिंग चढ्ढा’चे सगळे काम आता जवळ जवळ संपत आले आहे. त्यामुळे तो आता पुढच्या सिनेमाच्या तयारीला लागणार आहे. “लाल सिंग चढ्ढा’पूर्वी त्याने महाभारतावर एक सुपर मेगा मुव्ही करायचे ठरवले होते. पण त्यासाठी लागणाऱ्या कलाकारांची फौज, पैसा, शुटिंगचा प्रचंड पसारा जमवणे खूपच कष्टाचे काम होते. त्यामुळे हा प्रोजेक्ट काही काळ स्थगित करून त्याने “लालसिंग चढ्ढा’ ला सुरुवात केली होती.
“लालसिंग…’देखील गेल्या वर्षीच रिलीज होणार होता. मात्र करोनाच्या साथीमुळे सगळेच प्रोजेक्ट एक वर्षभरासाठी रखडले होते. आता आमिर खान “स्लाईस ऑफ लाईफ’ नावाच्या सिनेमाची तयारी करायला लागला आहे. या सिनेमाची स्क्रीप्टदेखील आता तयार आहे. त्यामुळे आता लवकरच या सिनेमाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
आमिरचा वाढदिवस 14 मार्चला असतो. याच दिवशी या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सध्या आमिरकडे गुलशन कुमारचा बायोपिक, विक्रम और वेताळचा रिमेक आणि महाभारत सारखे प्रोजेक्ट आहेत. यातल्या कोणत्या सिनेमाची घोषणा आमिर करेल, हे 14 मार्चला समजेल.