एक्‍सरसाईज करताना आमिरची लेक पडली अन….

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. सध्या ती मॉडेलिंगमध्येही आपले नशीब आजमावत आहे. इरा सोशल मीडियावर सक्रिय असून स्वतःचे लेटेस्ट फोटो तसेच व्हिडिओ ती सतत शेअर करत असते. यातलेच काही फिटनेसचे व्हिडिओ  तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले.

इराने व्हिडिओ पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती वर्कआऊट करताना दिसतेय. एक्‍सरसाईज करत असताना इरानं हातात स्टील रॉडला पकडले आहे तसेच या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, ‘मैं बिल्कुल ठीक हूं.’ तिच्या या गमतीशीर व्हिडिओला सध्या इंस्टाग्रामवर चांगली पसंती मिळत आहे.


तत्पूर्वी, इरान फारच बोल्ड फोटो काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. तिचे फोटो पाहून ती कोणत्याही अभिनेत्रीला हॉटनेसमध्ये मात देऊ शकते यावर कोणीही शंका घेणार नाही. फोटोत इराने गडद मेकअपसोबत लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. तिने फोटो शेअर करताना त्यावर लिहिले आहे की, ‘सॅटरडे नाइट वाइब.’ इराला अभिनयात फारस स्वारस्य नाही. दिग्दर्शनामध्ये तिला करिअर करायचे आहे. याआधी तिने नाटकाचे निर्मात्या सारिकासह फोटो शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

Couch-buddy! . . . #downtime #fatherdaughtertime #couchpotato #smile #cuddles

A post shared by Ira Khan (@khan.ira) on


इरा ज्या नाटकाचे दिग्दर्शक करणार आहे ते ग्रीकमधील एका पौराणिक कथेवर आधारित आहे. यूरिपिड्‌स मेडिया असे या नाटकाचे नाव आहे. या नाटकात युवराज सिंगची पत्नी हेजल कीच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल सांगताना इराने हेजलसोबतचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “हेझल म्हणाली की मैत्रिणीपेक्षाही एक अभिनेत्री म्हणून तुझ्यासोबत काम केल्याने मी जास्त आनंदी आहे.’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)