Aamir Khan : आमिरचं मोठं पाऊल! सिनेमाप्रेमींना होणार फायदा, नव्या दिग्दर्शकांसाठी सुवर्णसंधी, त्याने मांडलेलं नवं मॉड्युल काय? समजून घ्या…

Aamir Khan : बॅालिवूडमधला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने एक मोठं पाऊल उचलत सिनेमा इंडस्ट्रीत येऊ पाहणाऱ्या नवोदित फिल्ममेकर्ससाठी प्लॅटफॅार्म आणला आहे.
आमिर खान प्रोडक्शन ‘जनता का थिएटरच्या माध्यमातून नव्या टॅलेंटला त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. या संबंधित आमिरने पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. हे प्लॅटफॅार्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक यू ट्यूब चॅनेल असणार आहे.
सितारे जमीन पर थेट यूट्यूबवर
गेल्या काही दिवसांपूर्वी आमिर खानचा सितारे जमीन पर हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. पण आमिरने हा चित्रपट कोणत्याही ओटीटीवर रिलीज न करता थेट यूट्यूबवर रिलीज करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार येत्या १ अॅागस्टपासून सितारे जमीन पर हा चित्रपट आमिरच्या चॅनेलवर दिसणार आहे. मात्र, हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना १०० रुपयांचा शुल्क द्यावा लागणार आहे.
आमिरने सांगितली आकडेवारी
या पत्रकार परिषदेतून आमिरने त्याचा यामागाचा हेतू काय आहे, याचे स्पष्टीकरण दिले आहे. जगभरातील थिएटर्सच्या आकडेवारीचा दाखला देत त्यामानाने आपल्या थिएटर्सची संख्या कमी असल्याचे त्याने सांगितले. यामुळे जितक्या प्रेक्षकांपर्यंत पोहचायला हवे तितक्या प्रमाणात पोहचता येत नाही. आमिरने यासंबंधीच मॅाड्युलबाबत माहितीदिली त्याच्या म्हणण्यानुसार पेपरबेस माॅड्युल, अॅान डिमांड मॅाडेल अशी वर्गवारी त्याने केली आहे. या यू ट्यूबवर तुम्हाला फ्री कन्टेंट पाहता येणार आहे, मात्र काही कन्टेंटसाठी शुल्क द्यावे लागणार आहे.
यंगस्टर्सला संधी
सध्या सिनेमा इंडस्ट्रीत अनेक नवोदित दिग्दर्शक येऊ पाहता आहेत. मात्र, सगळ्यांनच संधी मिळते असं होतं नाही. नवोदित दिग्दर्शकाला यासाठी मोठी धडपड करावी लागते, त्यामुळे आमिरचा चॅनेल यंगस्टर्स म्हणजेच नवोदित कलाकारांना मोठी संधी देणारा आहे. याशिवाय तुम्ही दिग्दर्शक असले पाहिजे का तर नाही, तुम्ही कन्टेंट देत असाल तर तुम्हालही संधी मिळणार आहे. पण आमिरने यासाठी काही अटी घातली आहे. त्या अटी सविस्तर त्याने सांगितल्या नसल्या तरी जर चित्रपट आवडला तर आमच्या चॅनेलवर अपलोड केला जाईल, असे त्याने सांगितले. सेन्सारकडून सर्किफेकट मिळाल्यानंतर चित्रपट आमच्या प्लॅटफॅार्मवर रिलीज केला जाईल, असं त्याने सांगितलं.
यामुळे काय होईल?
खरंतर आमिरने पत्रकार परिषदेतून युट्यूब चॅनेल आणि त्या अनुषंगाने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मूळात सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर ओटीटी प्लॅटफार्म आहेत. त्यामुळे प्रेक्षकांकडे अनेक चॅाईस उपलब्ध आहेत. या माध्यमांमध्ये मोठी स्पर्धा आहे. अशातच एक नवा युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचणे हे कितपत सार्थ ठरेल आणि त्याचा फायदा होईल का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. याबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे आमिरने सांगितल्याप्रमाणे यंगस्टर्स म्हणजेच नोवोदित दिग्दर्शकांसाठी हा प्लॅटफॅार्म तयार करण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे. त्यामुळे हे कशापद्धतीने केलं जाणार हे पाहावे लागणार आहे.





