आमिर खानचा व्हिडिओ व्हायरल 

बॉलिवूडचा “मिस्टर परफेक्‍शनिस्ट’ आमिर खान नेहमी वेगवेगळ्या रूपात आणि ढंगात प्रेक्षकांसमोर येत असतो. त्याच्या प्रत्येक भूमिकेत विविधता पाहायला मिळते. तो यासाठी वेगवेगळ्या लूक्‍सचेही स्वत:वर प्रयोग करत असतो. तर आता त्याने चक्क म्हाताऱ्या व्यक्तिचा लूक धारण केला आहे. पण, हा लूक कोणत्याही चित्रपटासाठी त्याने केलेला नाही.

आपल्या ट्विटर अकाऊंटवर आमिर खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला अनेक लाईकस्‌ मिळत आहेत. या व्हिडिओत तो एका वयोवृद्ध व्यक्तीच्या भूमिकेसाठी तयारी करत असल्याचे दिसते. त्याचा हा लूक नेमका कशाप्रकारे साकारला गेला हे यात पाहायला मिळते. त्याने हा व्हिडिओ “लवकरच तुमच्या फोनमध्ये’, असे कॅप्शन देऊन शेअर केला आहे. हा लूक नेमक्‍या कोणत्या कारणामुळे धारण केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने चाहत्यांना त्याच्या सरप्राईझची उत्सुकता आहे.

दरम्यान, “दंगल’ चित्रपटात आमिर खान वयोवृद्ध व्यक्तिच्या भूमिकेत दिसला होता. त्याने या भूमिकेसाठी वजन वाढविले होते. पण तो पहिल्यांदाच पूर्णपणे टक्कल असलेल्या व्यक्तिच्या रूपात प्रेक्षकांच्या समोर आला आहे. तो त्याच्या या लूकमुळे ओळखायलाही येत नसल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.