आमीर खान आणि “शुभमंगल सावधान’चा डायरेक्टर आर.एस. प्रसन्न हे सध्या नवीन सिनेमाच्या प्रॉडक्शनबाबत चर्चा करत आहेत. हा एक स्पोर्टस ड्रामा असणार आहे. स्पॅनिश सिनेमा “कॅम्पेओनस’चा हिंदी रिमेक असणार आहे. आतापर्यंत आमिर आणि प्रसन्ना यांच्यात या संदर्भात चारवेळा मिटींग होऊन गेली आहे.
अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक संदेश देणारी ही कथा असणार आहे. अत्यंत उद्धट आणि दारुड्या बास्केटबॉल कोचवर मानसिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींना प्रशिक्षण देण्याची वेळ येते. अशी या सिनेमाची कथा आहे.
अर्थातच या सिनेमाच्या प्रॉडक्शनला सुरुवात झाल्यावर कोचची मध्यवर्ती भूमिका आमिर खानकडेच येणार हे निश्चित आहे. यापूर्वी “तारे जमीन पर’ आणि “दंगल’मधून आमिरने मार्गदर्शक, गुरू आणि प्रशिक्षकाचा रोल केला आहे. आता त्याला थोडी सनकी भूमिका करायची असेल.
“कॅम्पेओनस’ हा 2018 मध्ये आलेला स्पॅनिश सिनेमा आहे. मानसिक विकलांग व्यक्तींच्या समस्या या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न त्यातून केला गेला होता. भारतात मानसिक विकलांग व्यक्तींची संख्या अधिक असल्याने त्याचा हिंदी रिमेक करण्याची कल्पना पुढे आली. अजून या सिनेमातील इतभुलभुलैय्या 2 चे शूटिंग रखडलेर कलाकार आणि भूमिकांबाबत काहीच चर्चा झालेली नाही. पण लवकरच ते देखील निश्चित केले जाईल.