Aamir Khan | अभिनेता आमिर खानचा 2008 मध्ये प्रदर्शित झालेला ‘गजनी’ चित्रपट सुपरहिट झाला. आता आमिर खान गजनीचा सिक्वेल काढणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता तो नव्या चित्रपटांद्वारे पुन्हा दमदार कामगिरीसाठी सज्ज होत आहे.
आमिरने गजनीच्या सिक्वेलची घोषणा केली नसली तरी निर्माता अल्लू अरविंद सोबत गजनीची फ्रेंचाईजी बनवण्याबाबत चर्चा करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. 2025 मध्ये आमिर खान त्याच्या नव्या ब्लॉकबस्टर चित्रपटाची घोषणा करणार आहे. तो ‘गजनी 2’ चित्रपट असण्याची शक्यता आहे.
आमिर खानला सध्या गजनी 2 साठी चांगल्या स्क्रिप्टची प्रतीक्षा आहे. या सिनेमाच्या लोकेशनलाही नेक्स्ट लेवल नेण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या आमिर 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या ‘सीतारे जमीन पर’मध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे लोकेश ‘कुली’ आणि ‘कैथी 2’मध्ये तो व्यस्त आहे. हे दोन्ही चित्रपट 2025 मध्ये रिलीज होणार आहेत. अशा परिस्थितीत, जर सर्व काही ठीक झाले तर लवकरच गजनी 2 या चित्रपटाचे शूटिंगही सुरू होऊ शकते. Aamir Khan |
आमिर खान ‘गजनी 2’ साठी दक्षिणेतील चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांच्याशी चर्चा करत असल्याचे म्हटले जात आहे. त्याने अल्लू अरविंद आणि मधु मंटेना यांना ‘गजनी 2’ साठी प्रभावी विषय शोधण्यास सांगितले. मधु मंटेना त्यांच्या टीमसोबत या चित्रपटाच्या कल्पनेवर काम करत आहेत. Aamir Khan |