आमिर खानचे जसे भारतात भरपूर फॅन आहेत, त्याचप्रमाणे चीनमध्येही त्याचे भरपूर फॅन आहेत. चिनी प्रेक्षक आमिर खानला “नान शेन’ म्हणजेच पुरुष भगवान मानतात. चीनमध्ये सांस्कृतिक आदान प्रदान करण्याच्या उपक्रमातून आमिरने त्याचे “दंगल’ आणि “सीक्रेट सुपरस्टार’ या सिनेमांना चीनमध्ये रिलीज केले होते. या दोन्ही सिनेमांना चीनमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या दोन्ही सिनेमांना चीनमधल्या बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाईचे सिनेमे मानले जातात. चिनी प्रेक्षकांमध्ये आता आमिरची क्रेझ इतकी वाढली आहे की त्याला आंतरराष्ट्रीय स्टार मानले जायला लागले आहे.
सध्या आमिरच्या एका फोटोला सोशल मिडीयावर खूप लाईक मिळत आहेत. यामध्ये तो एक स्पेशल स्वेट शर्ट घातलेला दिसतो आहे. हा स्वेट शर्ट त्याला चिनी फॅनकडून सप्रेम भेट मिळाला आहे. पिवळ्या रंगाच्या या स्वेट शर्टवर “ए +’ असे लिहीलेले आहे. याशिवाय आमिरची स्वाक्षरी असलेले स्वेट शर्ट चिनी प्रेक्षक मोठ्या आनंदाना घालताना दिसत आहेत. आमिरचा आगामी सिनेमा “लाल सिंह चढ्ढा’ पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. इंग्रजीतील “फॉरेस्ट गम्प’ चा हिंदी रिमेक असलेल्या या सिनेमात आमिर अगदी अनोख्या ढंगात दिसणार आहे.