आमीर खानच्या मुलीचे दिग्दर्शक म्हणून पदार्पण

मुंबई – परफेक्‍शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आणि महाराष्ट्रात सर्वांना पाणी फाऊंडेशनमुळे सुपरिचित असलेला आमीर खान आपल्या “लालसिंह चढ्ढा’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे या चित्रपटातील लुकमुळे सोशल माध्यमांमध्ये चर्चेत आहे. तर आमिर खानची मुलगी सुद्धा सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटो शूटमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी ती तिच्या लुकमुळे नाही तर  तिच्या आगामी नाटकामुळे चर्चेत आहे.


बॉलिवूडच्या इतर स्टारकिड्स प्रमाणे चित्रपटांऐवजी थेट रंगभूमीवरुन अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय इराने घेतला आहे. मात्र ती अभिनेत्री म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून अभिनयक्षेत्राकडे वळली आहे.


तिच्या या निर्णयावर आमिरने नुकतेच “मला तुझा अभिमान वाटतो” अशा शब्दात इराचे कौतुक केले आहे. दरम्यान, ‘ब्रेक अ लेग’ असं या नाटकाचे नाव आहे. याबाबत इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.