आम आदमी पक्षाने पाळला धोका दिवस

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्यावतीने अनाधिकृत वसाहतींच्या रजिस्ट्रेशन मोहीमेच्या बनावटपणाबद्दल विरोधात आज सर्वत्र धोका दिवस पाळण्यात आला. अनाधिकृत वसाहतींच्या नियमीतीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे भासवण्यासाठी भाजपने दिल्लीत आता तोंड देखल्या ऑन लाईन रजिस्ट्रेशनचे नाटक सुरू केले असून या बाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आज हा उपक्रम पाळण्यात आला.

त्यानुसार आम आदमी पक्षाच्या सर्व नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी ठिकठिकाणच्या अनाधिकृत वसाहतींमध्ये जाऊन जनजागृती सभा घेतल्या. त्यांचे म्हणणे असे की काही वर्षांपुर्वी कॉंग्रेसनेही असाच एक उपक्रम राबवत लोकांची दिशाभुल केली होती. आता तसाच प्रकार आम आदमी पक्षाने दिल्लीतही सुरू केला आहे.

या मोहीमेचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी संगम विहार मध्ये राय यांनी बवाना मध्ये, संजयसिंग यांनी बुरारी मध्ये, दिलीप पांडे यांनी विकास पुरी मध्ये आणि सौरभ भारद्वाज यांनी देवली मध्ये सभा घेऊन लोकांन या विषयीची माहिती देत जनजागृती केली.

भाजपचे लोक अनाधिकृत वसाहतींच्या संबंधांत लोकांशी खोटारडेपणा करीत आहेत. गेले पाच दिवस या ऑन लाईन रजिस्ट्रेशनच्या संबंधात भाजपच्या नेत्यांनी विविध वक्तव्ये केली पण हे ऑन लाईन रजिस्ट्रेशन नेमके कशासाठी केले जात आहेत याचा समाधानकारक खुलासा त्यांनी केला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.