चंदिगड – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शालेय शिक्षणाबद्दल एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील सर्व खासगी शाळांना शालेय शुल्क वाढवण्यास किंवा पुस्तके, गणवेश किंवा स्टेशनरी वस्तूंची खरेदी विशिष्ट दुकानांमधूनच खरेदी करण्याची सक्ती करण्यास बंदी घातली आहे. पालकांना आपल्या पाल्यांना शिक्षण उपलब्ध करून द्यायचे असते. मात्र आता हे शिक्षण महाग झाले आहे. ते परवडण्याजोगे नाही.
शालेय शिक्षणाशी संबंधित हे दोन महत्वाचे निर्णय पंजाब सरकारने घेतलेले आहेत, असे मुख्यमंत्री मान यांनी म्हटले आहे. व्हिडीओ संदेशातून या निर्णयांची घोषणा करण्यापूर्वी ते बोलत होते.
जेंव्हा नवीन प्रवेश दिले जातील, तेंव्हा पंजाबमधील कोणत्याही खासगी शाळेकडून या शैक्षणिक सत्रामध्ये शुल्कवाढ केली जाणार नाही, असे मान म्हणाले. तसेच शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके, गणवेश आणि स्टेशनरी एखाद्या विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती देखील केली जाऊ शकणार नाही.
पंजाब में शिक्षा इतनी महंगी हो गई कि आम लोगों की पहुंच से दूर होती जा रही है।
इसलिए आज हमने फैसला लिया है कि कोई प्राइवेट स्कूल इस सेशन में फीस नहीं बढ़ा सकेगा और किसी एक दुकान से किताबें खरीदने के लिए मजबूर नहीं करेगा।
हम मनुष्य के तीसरे नेत्र विद्या को व्यापार नहीं बनने देंगे pic.twitter.com/WycWPdMVrG
— Bhagwant Mann (@BhagwantMann) March 30, 2022
शाळांकडून पालकांना असा दुकानांचे पत्ते उपलब्ध करून दिले जायला हवेत. यापैकी कोणत्या दुकानातून खरेदी करायची, याचा निर्णय सर्वस्वी पालकांनीच घ्यायचा आहे. या संदर्भातील राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच केली जाईल, असेही मान म्हणाले.
पंजाब के CM @BhagwantMann जी के शिक्षा पर दो अहम फै़सले-
– निजी स्कूलों के फ़ीस बढ़ाने पर पाबंदी
– इस सत्र में फ़ीस बढ़ाने की अनुमति नहीं
– माता-पिता अपनी सहूलियत से Books-Dress ख़रीद सकेंगे
– कोई भी स्कूल किसी ख़ास दुकान से Books और Dress ख़रीदने के लिए मजबूर नहीं करेगा pic.twitter.com/ojrJKJc1HO— AAP (@AamAadmiParty) March 30, 2022