नवी दिल्ली – काँग्रेस आणि आम आदमी या दोन पक्षामध्ये युती होणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. काही दिवसांपासून यूती होणार की नाही यावर प्रश्न चिन्ह होते. मात्र, अखेर काँग्रेस-आपमधील युतीचा सस्पेन्स संपला आहे. कारण अनेक दिवसाच्या वाटाघाटी आणि चर्चेनंतर अखेर अंरविद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पक्ष’ आणि राहुल गांधी यांच्या ‘काँग्रेस’ पक्षात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड याठिकाणी युती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
माहितीनुसार, दिल्लीमध्ये आप 4 तर काँग्रेस 3 जागेवर तर हरियाणा मध्ये काँग्रेस 1, जननायक जनता दल (जेजेपी) 2 आणि आप 1 जागेवर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची सांगितले जात आहे. तर चंदीगडमध्ये काँग्रेस उमेदवारांना आप पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.