आपचे आठ उमेदवार जाहीर

मुंबई  (प्रतिनिधी)– राज्यात आम आदमी पक्षाने (आप) सोमवारी आठ विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आपच्या उमेदवारांच्या यादीत उच्चशिक्षीत उमेदवार असून सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आणि उद्योजक यांना प्रामुख्याने स्थान देण्यात आले आहे.

ब्रह्मपुरीतून (जि. चंद्रपुर) पारोमिता गोस्वामी (एल्गार आंदोलनाच्या नेत्या), मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वमधून विठ्ठल गोविंद लाड (कष्टकरी शेतकरी संघटना), कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघातुन डॉ. आनंद गुरव (बालरोगतज्ज्ञ), नाशिकच्या नांदगाव मधून विशाल वडघुले (ऍटो मेकॅनीक), पुण्यातील कोथरुड विधानसभेतून अभिजित मोरे (जनआरोग्य अभियान कार्यकर्ते), मुंबईच्या चांदीवलीतून सिराज खान (उद्योजक), मुंबईच्या दिंडोशीतून दिलीप तावडे (उद्योजक), पुण्याच्या पर्वती मतदारसंघातून संदीप सोनवणे (बचत गट चळवळ कार्यकर्ते) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत आप 35 जागा लढवणार आहे. आपने 2014मध्ये लोकसभेच्या 48 जागा लढवल्या होत्या. त्यात मोठा पराभव झाल्यानंतर या पक्षाने राज्यात एकही निवडणुक लढवली नव्हती. यावेळी पहिल्यांदाच आप विधानसभा लढवत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.