आलिया भट्टने आतापर्यंत आपल्या तीन चित्रपटांमध्ये गाणे गायले असून आगामी चित्रपट “सडक 2’साठीही ती एक रोमॅंटिक गीत गाणार आहे. ते सध्या तयार नसले तरी गाण्याचे कंपोझर जीत गांगुली यांनी गाण्याचे स्क्रॅच व्हर्जन आलियाकडून गाऊन घेतले आहे.
जीत गांगूली यांच्याकडून गाण्याचे कंपोझिशन पूर्ण झालेले असले तरी गाण्याचे बोल अद्याप निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे सध्या हे गीत पूर्णपणे तयार नसून गांगूली यांना आलियाच्या आवाजाची चाचणी घ्यायची होती. त्यामुळे त्यांनी एका आठवड्यापूर्वीच या गाण्याचे स्क्रॅच व्हर्जन आलियाकडून गाऊन घेतले आहे. या गाण्याचे लिरिक्स स्वतः महेश भट्ट हे लिहून घेत आहेत.
विशेष म्हणजे “सडक 2’चे दिग्दर्शन स्वतः महेश भट्ट करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी ते 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसले आहेत. तर, आलियाचा हा त्यांच्यासोबतचा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटातील सर्व गाणी ऑगस्ट महिण्यात रेकॉर्ड करण्यात येणार आहेत. त्या वेळीच या गाण्याचेही रेकॉर्डिंग करण्यात येणार असल्याचे गांगूली यांनी सांगितले.