अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नेहमीच साध्या लुकमध्ये असते. मात्र याच साध्या लुकमधील साडीलुकसुद्धा प्रेक्षकांना भुरळ घालणारा आहे. नुकतंच त्यांनी साडीमध्ये क्लासिक फोटोशुट करुन घेतलं.
या सिंपल लुकमध्ये त्या प्रचंड खुलून दिसत आहेत. खरंतर साडीलुकमध्ये त्या नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकतात. मात्र लॉकडाऊनमध्ये त्यांनी स्वत:वर प्रचंड मेहनत करत हा क्लासिक लुक कॅरी करताना त्या दिसत आहे.
ऐश्वर्या नारकर या स्वभावाने अत्यंत साध्या असलेल्या सासूची भूमिका साकारणार आहेत तर या सासूला श्रीमंताघरची सून मिळणार आहे. आधीच घरात असलेल्या दोन श्रीमंताघरच्या सुनांच्या अनुभवानं ही येणारी नवी सून कशी असेल असा प्रश्न त्यांना पडला आहे.
View this post on Instagram
रूपल नंद आणि यशोमान आपटे ही जोडी या मालिकेत पाहायला मिळणार आहे. एवढंच नाही तर ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हेही बऱ्याच काळाने एकत्र भूमिका साकारत आहेत.
View this post on Instagram