सातारा- सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेतील 27 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं. त्यादरम्यान येथील तब्बल 27 जणांना कोरोनानं ग्रासलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रीकरण सुरू केल्यानंतरही ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. या मालिकेत अलका कुबल देवी काळूबाईची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकरांची भूमिका आहे.
त्यांना या दरम्यान कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सध्या आशालता यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
कोरोनाच्या कहरामुळे राज्यातील सर्व महत्त्वाच्या सेवांसह चित्रपट व मालिकांचं चित्रीकरण बंद ठेवण्यात आलं होतं. काही आठवड्यांपूर्वी पुन्हा चित्रीकरण सुरू झालं आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे