मुंबई : वरळी मतदार संघातून आपण विधानसभा लढवणार असल्याचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सोमवारी जाहीर केले. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते. आदित्य यांच्या रुपाने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
गेले काही दिवस आदित्य निवडणूक लढतील असे संकेत मिळत होते. मात्र त्याला ठाकरे यांनी दुजोरा दिला नव्हता, मात्र आज त्यांनी स्वत:च ही घोषणा केली.
आपल्याला वरळीचा विकास करायचा आहे मात्र सोबत महाराष्ट्रदेखील पुढे न्यायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी असून त्यासाठी काम करणार आहे. फक्त वरळी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करणार आहे. मी प्रत्येक गावात प्रचार केला पाहिज. त्यामुळे तुन्ही माझा प्रचार करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.
“जर आपली परवानगी असेल, विद्यमान आमदारांची परवानगी असेल आणि शिवसैनिकांची परवानगी असेल तर मी शिवरायांच्या साक्षीने, सर्व महापुरुषांच्या साक्षीने, माझ्या आजी आजोबांच्या साक्षीने मी निवडणुक लढविणार ही घोषणा करतो.”
-युवासेनाप्रमुख @AUThackeray pic.twitter.com/aJW0vlLaHi— ShivSena – शिवसेना (@ShivSena) September 30, 2019