गोरगरीब कुटुंबांचे आधारवड “आधार’ हॉस्पिटल

पुणे – शहरात रुग्णांना ज्या प्रकारे सुविधा मिळतात त्या सुविधा ग्रामीण भागातील रुग्णांना मिळाल्या पाहिजेत यासाठी डॉ. आशिष चव्हाण यांनी आधुनिक पद्धतीचे सुसज्ज असे आधार हॉस्पिटल पारगाव (ता. आंबेगाव) येथे उभाराले. त्याचा गोरगरीब कुटुंबांना “आधार’ मिळाला. तर करोना काळतही रुग्णांना खऱ्या अर्थाने “आधार हॉस्पिटल’चे डॉ. आशिष चव्हाण करोना योद्धासोबत “देवदूत’ ठरले आहेत.

मंगरुळ पारगाव (ता. जुन्नर) येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले डॉ. आशिष चव्हाण यांनी उच्चशिक्षण घेऊन डॉक्‍टरकीची पदवी संपादन केल्यानंतर आपण ज्या भागात जन्मलो. त्या भागातील सर्वसामान्य जनतेला कोणत्याही आजारावरील उपचारासाठी शहरात जावे लागू नये. पैशाची आणि वेळेची बचत व्हावी, त्यांच्या आजाराचे योग्य निदान आणि उपचार व्हावे,

यासाठी आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्वभागात मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पारगाव-शिंगवे येथे डॉ. आशिष चव्हाण (इचइइड) व डॉ.सौ.स्मिता चव्हाण (इया दाम्पत्याने मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटलप्रमाणे सर्वप्रकारच्या आत्याधुनिक सुविधा असलेल्या आधार हॉस्पिटलची 2003 मध्ये मुहूर्तमेढ रोवली. आज त्या हॉस्पिटलचे एका वटवृक्षात रूपांतर झाले आहे. येथे सर्व आजाराचे निदान आणि उपचार आणि सर्व प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये करण्यात येतात.

येथे जनरल हॉस्पिटल, प्रसुतिगृह, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, डीजिटल एक्‍सरे सुविधा, अत्याधुनिक अतिदक्षता विभाग,फिजीओथेरीपी विभाग, 24 तास मेडिकल सुविधा, सुसज्ज रुग्णवाहिका, कॅशलेस इन्सुरन्स सुविधा, ए.सी. डीलक्‍स रुम, पॅथालॉजी लॅबोरटरी आदि सुविधा आहे. कोरोना आजारातून बरे झाल्यानंतर डॉ. आशिष चव्हाण हे आधार हॉस्पिटलच्या रुपाने एक प्रकारे देवदूत भेटला असल्याची भावना अनेकांनी व्यक्‍त केल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.