Aadhaar Card : आधारकार्ड संबंधी कोणतीही समस्या असू द्या; UIDAIच्या ‘या’ Toll Free नंबरवर करा फोन

Aadhaar Card Helpline No – आजच्या काळात आधार कार्ड हे एक महत्वाचे कागदपत्र आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठीचे महत्वाचे ओळखपत्र आहे. यूआयडीएआय (UIDAI)कडून वेळोवेळी आधारसंबंधी अपडेट्‌स दिले जातात.

मोबाईल नंबर, नाव, पत्त्यात बदल तसेच इतरही सर्व माहिती नागरिकांपर्यंत ट्‌विट च्या माध्यमातून पोहोचवली जाते. मात्र, आता यूआयडीएआयने एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. 1947 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला असून तुम्हाला या नंबरवर आधारकार्डसंबंधी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं, समस्येचे समाधान केले जाणार आहे.

युआयडीएआयने ट्‌विट करून या हेल्पलाईन नंबर संदर्भात माहिती दिली आहे. तसेच सोमवार ते शनिवार या दिवसांत सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत तर रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही या 1947 हेल्पलाईन नंबरवर संपर्क करू शकता. तसेच 24*7 आयव्हीआर सुविधा सुरू असणार असल्याचे युआयडीएआय कडून सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.