नवी दिल्ली – येथील मुखर्जी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी एका विद्यार्थ्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या संशयास्पद स्थितीत आढळून आला. दीपक कुमार मीना असे त्याचे नाव असून असून तो येथील पीजीमध्ये राहून नागरी सेवांची तयारी करत होता. तो ११ सप्टेंबरपासून बेपत्ता होता.
त्याच्या एका नातेवाईकाने 14 सप्टेंबर रोजी मुखर्जी नगर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस दीपकबाबत सुगावा शोधण्यात व्यस्त होते. पोस्टमॉर्टमनंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. पोलीस या प्रकरणाचा इतर अनेक पैलूंवरून तपास करत आहेत.