जुन्नर – तालुक्यातील बेलसर येथे शेतात काम करणाऱ्या तरूणाच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला विकास सखाराम केदार (वय २७ वर्ष) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना आज शनिवारी (दि १० एप्रिल) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आमलेवाडी येथील आदीवासी ठाकर समाजातील विकास सखाराम केदार या तरुणाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे तो बोतार्डे आमलेवाडी येथील एका शेतकऱ्याकडे कामाला जात होता शेतात कांदा काढणीचे काम सुरु असताना दुपारी जेवणाची सुट्टी झाली होती त्यावेळी कामावर असलेल्या महिला जेवण करण्यासाठी बसल्या होत्या तर विकास हा कांद्याच्या गोण्या वाहून नेण्याचे काम करत होता.
त्याचवेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्यास उपचारासाठी जुन्नर येथील ग्रामीण रूग्णालयात नेले होते; मात्र त्यापूवीच मृत्यू झाला होता. त्याच्यामागे आई वडील पत्नी व तिन मुले असा परिवार आहे. विकास याच्या आकस्मीक मृत्यूमुळे घटनेमुळे केदार यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.