हडपसरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी, सिरम कंपनीच्या मागील झाडीत लपल्याची भीती

वनविभागाकडून शोध सुरु; हल्ला केलेला प्राणी बिबट्याच असल्याची स्पष्टता नाही - वनाधिकारी

हडपसर – हडपसर जवळील साडेसतरानळी मधील गोसावी वस्ती मध्ये पहाटेच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातला, बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे, तीन महिन्यात या भागात दुसऱ्यांदा बिबट्याने येऊन हल्ला केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संभाजी बबन आटोळे असे जखमी युवकाचे नाव आहे. संभाजी व अमोल लोंढे सकाळी पायी जात असताना गवताच्या झुडपात लपलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला, या हल्ल्याने युवक गोंधळाला त्यास बरगड्या, पायाला जखमा झाल्या आहेत, लोंढे याने आरडाओरडा केल्यावर हल्ल्यायानंतर बिबट्याने पुन्हा झुडुपात धूम ठोकली. वस्ती परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

बिबट्याने हल्ला केल्याची माहिती कळताच गोसावी वस्ती येथे माजी उपसरपंच रुपेश तुपे तात्काळ पोहोचले नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वन विभागास आमदार चेतन तुपे यांनी कळविल्याने रेस्क्यू टिम दाखल झाली बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची माहिती घेतली. सिरम कंपनी परिसरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फिरून माहिती घेतली मात्र बिबट्या सापडला नाही. गेल्या काही दिवसांपासून साडेसतरानळी, महमंदवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे, बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रे, वासरू मृत्युमुखी पडले आहेत त्यातच आज युवकावर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गवताळ प्रदेश असल्याने नेमका कोणता प्राणी असेल हे कळत नाही, तपास सुरू आहे, पायाचे ठसे नाहीत वन्यप्राणी आहे आम्ही त्यादृष्टीने माहिती घेत आहोत तरस किंवा बिबट्या असू शकतो एका युवकावर हल्ला झाला आहे त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ,अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस.मुकेश जयसिंग यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.